Wednesday 2 May 2012

स्वातंत्र्याच्या मशाली



३१ मार्च १९३१, इस्टर सनडे – रविवारचा दिवस, अमेरिकतील न्यूयोर्क शहरातील फिफ्थ अवेन्यू, उचाभ्रू  वस्तीचे ठिकाण, अमेरिकन स्त्री पुरुष रस्त्यावरून रमत गमत सुट्टीचा आस्वाद घेत आहेत. अशातच उच्चभ्रू, सुंदर दिसणाऱ्या काही स्त्रिया, बर्था हंट ही त्यामधील एक, सिगारेट पेटवतात व भर रस्त्यात धूम्रपानाचा आस्वाद घेतात. ही घटना खरतर अमेरिकन लोकांसाठी नवीनच कारण सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी धुम्रपान करणे हे अतिशय असभ्यपणाचे लक्षण मानले जायचे. एकूणच स्त्रियांनी धुम्रपान करू नये ही समाज मान्यता. पण पुरुष मात्र सर्रास सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करत असत ते ही ऐटीत. थोड्याच वेळात ही बातमी कव्हर करायला वार्ताहर तिथे पोहचले, त्यांनी या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या.  तुम्हाला  अशा पद्धतीच अभियान का करावा वाटल? या प्रश्नाला हंटने उत्तर दिल “रस्त्यावर मी सिगारेट ओढत असताना एका माणसाने मला ती विझवायला भाग पाडलं कारण एक स्त्री रस्त्यावर धुम्रपान करते आहे हे त्याला सहन झाल नाही, मी ही गोष्ट जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगितली तेव्हा आम्ही सर्वांनीच या वर काहीतरी उपाय केला पाहिजे असा विचार केला”. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही, स्त्रिया आता पुरुषांच्या मानाने कुठेही मागे नाहीत, स्त्रिया आता स्वतंत्र आहेत, आम्ही पुरुषांची ही मक्तेदारी मोडून काढणार आहोत, सिगारेट ही आमची “torch of freedom”  आहे अशा स्वरूपाचे निवेदन या स्त्रियांनी वार्ताहरांना दिले. दुसऱ्या दिवशी जवळपास प्रत्येक अमेरिकन वृतपात्राने या घटनेची दाखल घेतली होती, धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांचे फोटो व मुलाखती छापून आल्या अन् त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं.
      वर वर पाहत ही घटना खूप उत्स्फूर्त वाटते, प्रत्येक क्षेत्रातील पुरुषांच्या मक्तेदारीला त्रासलेल्या स्त्रियांचं हे बंड आहे असं वाटत. पण ही घटना उत्स्फूर्त तर नाहीच नाही पण ती सहज घडलेली ही नाही, ती अतिशय सुनियोजित होती अन् काही ध्येय साध्य करण्यासाठी घडवून आणली गेली होती, या घटने मागचा मास्टर माईंड होता ‘एडी बार्नेस’.
      बार्नेस हा पब्लिक रिलेशनचा पितामह समाजला जातो, बार्नेसची दुसरी ओळख म्हणजे तो प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईडचा पुतण्या. बार्नेस हा मानसशास्त्राचा त्यातले त्यात मनोविश्लेषणशास्त्राचा  चांगलाच अभ्यासक होता.  तो मोठमोठ्या कंपन्यांचा सल्लागार होता, आपल्या मालाचा खप कसा वाढवावा या विषयी तो कंपन्यांना सल्ले देत असे. अमेरिकन टोबको कंपनीचाही तो सल्लागार होता. या काळात अमेरिकन टोबको कंपनीचा विक्री दर एका saturation level  ला पोहचला होता, विविध प्रकारे प्रयत्न करूनही त्यात वाढ होत नव्हती, पुरुष जरी मोठ्या प्रमाणात धुम्रपान करत असले तरी स्त्रियांचे धूम्रपानाचे प्रमाण अगदीच नगण्य म्हणजे ५% होते. कारण फक्त वेश्या वा वाईट चालीच्या स्त्रिया धूम्रपान करतात असा समाज होता. कुलीन स्त्रिया धुम्रपान करत नसत अन् तस करणे हे समाजमान्य नव्हते. “ पण जर स्त्रियांमध्ये धूम्रपानाच प्रमाण वाढल तर आपल्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये मोठीच वाढ होईल “ असा अमेरिकन टोबको कंपनीचा प्रमुख  जॉर्ज हिलचा अंदाज होता. “ महिलांमध्ये धूम्रपानाचे वाढलेले प्रमाण ही तर आमच्यासाठी अंगणातील सोन्याची खाण ठरेल ” असं तो म्हणत असे. अशाप्रकारे स्त्रियांना धुम्रपानाकडे आकृष्ट करण्याच आव्हान बार्नेसने स्वीकारलं. धुम्रपानामुळे अतिरिक्त चरबी वाढत नाही व त्यामुळे स्त्रिया सुडौल राहू शकतात असा प्रचार व जाहिराती करायला बर्नेसने सुरवात केली. पण त्याचा म्हणावा तितका फायदा झाला नाही, तेव्हा बार्नेसने मनोविश्लेषक व फ्राईडचा शिष्य ए ए ब्रिल याचा सल्ला घेतला. ब्रिलच्या मते सिगारेट हे पुरुषी अहंकाराच, मर्दपणाच, पुरुषी वर्चस्वाच प्रतीक होय. धुम्रपानामुळे पुरुषांमधील ही वृत्ती सुखावली जाते. म्हणजेच तुमच्या सुप्त मनातील वासना वा भावना ही एखाद्या वस्तूच्या वापराशी वा उपभोगाशी जोडली तर ती वस्तू वापरण्याकडे वा उपभोगण्याकडे माणसाचा कल वाढतो, जणूकाही  त्या वस्तूच्या वापरातून तो आपली सुप्त मनातील वासना वा भावना पूर्ण करत असतो, या मुळेच पुरुषांमधील धूम्रपानाच प्रमाण लक्षणीय आहे.
      बर्नेसने स्त्रियांनी धुम्रपान करणे हे पुरुषी अहंकारला, वर्चस्वाला आव्हान होय, ही एक स्त्री स्वातंत्र्याची अभिव्यक्ती होय अशा प्रकारचे जनमानस ( की स्त्री मानस?) तयार व्हावे या साठी प्रयत्न करायचे ठरवले. स्त्रियांच्या धुम्रपानाला हा नवा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी त्याने वरील घटना घडवून आणली,  बर्था हंट जी की या torches of freedom  या अभियानाची प्रमुख होती, ती बर्नेसची सेक्रेटरी होती, अन् बाकीच्या तिच्या मैत्रीने या भाडोत्री मॉडेल्स होत्या. ही घटना प्रसिद्धी माध्यमांना लगेच कळेल अशी व्यवस्थाही केली गेली होती. या धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांनी काय मुलाखती द्यायच्या हे ही आधीच ठरले होते. याचा परिणाम म्हणजे ५% वर असणारे स्त्रियांचे धूम्रपानाचे प्रमाण १९२९ पर्यंत १२% वर गेले, तर १९३५ पर्यंत ते १८% वर गेले, १९६५ मध्ये एकूण सिगारेट उत्पादनापैकी ३३% सिगारेटी महिला ओढत असत.  अन् हे वेगळ सांगायला नकोच की बार्नेसला हे करण्यासाठी भरमसाठ रक्कम मिळाली.
      माणसाच्या भाव भावनांचा उपयोग एखाद्या वस्तू वा सेवेच्या जाहिरातीसाठी करणे हे काही आपल्याला नवीन नाही, खर तर आजच्या बाजारपेठेचे हे तत्वच आहे, पण स्वतंत्र हे मूल्य धुम्रपान या कृतीशी जोडण मला फारच अनैतिक वाटत. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध आपण कोणत्या कृतीतून करतो ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते, अशा वेळी दगडफेक, जाळपोळ करणे व धुम्रपान करून निषेध व्यक्त करणे मला सारखेच वाटते. त्या कृतीचे परिणाम सकारात्मक असावेत असं मला वाटत.

Tuesday 19 April 2011

सफर - रेड स्टोन फार्म

शनिवारी संध्याकाळी आपल्याला पाचगणीला जायचं आहे असं पानसे सरांनी सांगितल, कशासाठी, कुणाकडे हे जरा गुपितच होत, सरांचे काही मित्र आमच्या बरोबर असणार होते, सरांसोबत फिरण्यात मजाच असते म्हणून आम्हीही काहीही न विचारता संध्याकाळी सरांच्या गाडीत जाऊन बसलो, अन गाडी वाईहून पाचगणीला निघाली, तस अंतर अगदीच १०-१२ किलोमीटरच, घाट चढताच थंडावा जानउ लागला. पाचगणीत पोहचताच आमची गाडी एका फार्म हाउस मध्ये शिरली, दिवस मावळला होता, थोडासा अंधारही होता, आत जातानाच आपण खूप छान जागी आलोय असं वाटत होत. बाहेर बाग, शेत अन आत दोन माजली युरोपिअन शैलीच घर. पानसे सरांनी कुठल्यातरी भन्नाट जागी आपल्याला आणलय असं वाटायला लागल.


आम्ही गाडीतून उतरताच घराच्या यजमानबाई मोना यांनी आमचा छान स्वागत केल, त्याचं वय साधारण ६०-६२ असाव पण त्या अजूनही उत्साही अन चपळ वाटत होत्या अन महत्वाच म्हणजे त्या छानपैकी मराठी बोलत होत्या. त्या आम्हाला जास् जास् त्यांच्या घरात घेऊन जाऊ लागल्या तस त्या घर बद्दलच कुतूहल वाढू लागल. घर बांधताना लाल दगड व मातीचा छानच उपयोग केला होता. आम्ही घर पाहताना एकमेकांशी घराबद्दलच बोलत होतो ‘अरे हे पहाना’, ‘हे किती छान आहे’, ‘बघना कसला एन्टीक पीस आहे ’. घर चांगलाच प्रशस्त होत, कितीतरी पेंटींग्ज, हस्तकलेचे नमुने छानच मांडून ठेवले होते.
मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथे भरपूर पुस्तके होती, जास्त होती ती पर्यावरण, Ecology या विषयाशी निगडीत तसेच मानसशास्त्र, समाजशास्त्र, छंद या विषयीची असंख्य पुस्तके होती. दोन मोठी कपाटे, बेडरूममधील कप्पे एवढंच काय स्वयंपाकघरातील काप्यान् मधेही पुस्तके होती. एवढ्या प्रशस्त घरात हे दोघे व त्यांची दोन मुले येवून जाऊन असतात, मग एवढ मोठ घर कशाला? नंतर असं कळले की ते या फार्म मध्ये मुलांची पर्यावरण विषयक शिबीर घेतात. पर्यावरण, सेंद्रीय शेती व शाश्वत जीवन शैली हा पीटर व मोनाचा आवडीचा, अभ्यासाचा व कार्याचाही विषय. पीटर याचं वय आहे ७०, महत्वाची गोष्ट म्हणजे पीटर यांची दृष्टी अधू आहे, ते दिवसाच्या प्रकाशात माणसे ओळखू शकतात पण वाचू मात्र शकत नाहीत, पण पीटर यांचाशी गप्पा मारणे खुपच आनंददायी होते, त्यांच्या बोलण्यात या अधुपनाबद्दल कोणतीही खंत नव्हती उलट या मुळे घडणाऱ्या गमती जमाती ते सांगायचे.

मोना या पर्यावरण व त्याचा होत असलेल्या ऱ्हास या बद्दल खुपच तळमळीने बोलतात. येथे मुलांसाठीची पर्यावरण विषयक शिबीर नेहमीच होत असतात. पर्यावरणाबद्दल नुसतीच बंद खोलीत बसून माहिती सांगण्यापेक्षा मुलांना स्वताच्या घराभोवती असणाऱ्या सेंद्रीय शेतीत, घरामागच्या जंगलात फिरायला नेऊन मुलांना निसर्ग जवळून दाखवायला, पर्यावरण हे छोट्या छोट्या खेळांमधून शिकवणं त्यांना जास्त आवडत, मग तो अन्नसाखळी उलगडून दाखवणारा खेळ असो वा ट्रेजर हंठ मध्ये घरात व परिसरात शाश्वत जीवन शैली जगण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त वस्तू शोधणे हा खेळ असेल. त्यांच्या फार्म हाउस मध्ये पवनचक्की, गोबर गैस प्लांट, सोलर लाइट असे काही अपारंपारिक उर्जा स्त्रोत मुलांना प्रत्यक्ष चालू स्थितीमध्ये पाहता येतात. खरतर हि मुल दोन–तीन दिवस येतात व परत आपापल्या ठिकाणी जातात, दोन दिवसात मुलांना पर्यावरण समजन तस अवघडच, तेव्हा पर्यावरण शिक्षणाचा साधारण वर्षभर चालेल असा कार्यक्रम करण्याचा विचार मोना व पीटर करत आहेत.

महाबळेश्वर-पाचगणी हा निसर्गाच्या विविधतेने नटलेला, खूप जैवविविधता असणारा प्रदेश आहे, पण पर्यटनासाठी वाढणारी हॉटेल्स, घरे, लॉज, रस्ते अन कचरा यामुळे पर्यावरणाच मोठाच नुकसान होत आहे असं मोना म्हणाल्या. सर्वात वाईट म्हणजे इथल्या राहावाशी लोकांना या निसर्ग संपदेची जान नाहीये तोच हे धन ओरबाडून पर्यटकांना विकतोय असं मोना यांना वाटते. पर्यटन असावे पण ते पर्यावरणाला पूरक, पर्यावरणाचे संवर्धन करणारे असावे न कि विध्वंसक. हे साध्या करण्यासाठी इथल्या लहान मुलांना पर्यावरणाची ओळख व संवर्धनाचे महत्व पटवून देणे खूप गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या, या साठी ते दोघे काम करतातच पण दोनच व्यक्ती खूप अपुऱ्या आहेत असं त्यांना वाटत. या कामासाठी आपण सर्वांनी एकत्र याव व हे काम मोठ्या प्रमाणात व्हाव असं त्यांनी बोलुन दाखवल. अशा या सुंदर जागी नेल्याबद्दल पानसे सरांचे आम्ही खूप आभारी आहोत.
-- त्रिशूल कुलकर्णी, वाई

Friday 5 February 2010

आझाद मैदानावरील धरणे

मी, सचिन, गणेश अन संजय धावपळ करतच आझाद मैदानावर सव्वादोनच्या सुमारास पोहचलो, आम्हाला वाटल उशीर झाला असेल, कदाचित कार्यक्रम सुरूही झाला असेल, दोन वाजताची वेळ ठरलेली होती. निर्माणसह महाराष्ट्रातील २८ संघटना आझाद मैदानावर शासनाच्या धान्यापासून दारू बनवण्याच्या धोरणा विरोधात, महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी धरणे धरणार होत्या. आता पर्यंत अमुक संघटनेने, अमुक ठिकाणी, काही मागण्यांसाठी किवा विरोध दर्शवण्यासाठी धरणे धरले, मोर्चा काढला वगैरे गोष्टी फक्त वर्तमानपत्रातून वाचत ऐकत आलो होतो. आज मात्र प्रत्यक्ष अनुभवणार होतो. आम्हाला पोहचायला थोडा उशीर झाला कारण सकाळपासन आम्ही वाशीच्या ऑफिस मध्ये धरण्यासाठी लागणारी पोस्टर्स बनवत होतो, तर सचिन मुख्यमंत्र्यांना द्यावयाच्या निवेदनावर शेवटचा हात फिरवत होता. आम्ही चौघांनी ऑफिसात नुसता गोंधळ घातला, पोस्टर बनवायला पेपर आहे, तर स्केच पेन नाही, प्रिंटर बिघडलाय, पेन ड्राईव चालत नाहीये, अशा अडथल्याना पार करत पाच सहा पोस्टर्स बनवली. आझाद मैदानावर पोहचलो तेव्हा आम्ही चौघे सोडून आणखी फक्त चार-पाच जण जमली होती अन कार्यक्रम सुरु काय पण आणखी काही तयारीही झाली नव्हती, एवढ्या संघटनांपैकी पैकी प्रत्येकाचा एक-एक कार्यकर्ता सुद्धा आला नव्हता, माझा खरतर मूड ऑफ झाला. आझाद मैदानावर एक दुसराच कार्यक्रम चालू होता त्यासाठी बरीच जनता आली होती त्यामुळे आम्ही एका कोपर्यात जाऊन थाबलो. हळू हळू एक-एक जण येत होता, मागे झालेल्या धान्यापासून दारू विरोधी परिषदेमुळे बरेच चेहरे ओळखीचे वाटत होते. बऱ्याच जणांनी पोस्टर्स आणली होती, मग आम्ही ती भिंतीवर लावान्यास सुरवात केली, एकीकडे माइक व स्पीकर्सची व्यवस्था होत होती. तीन वाजेपर्यंत ३००-३५० जनता जमा झाली, बहुताव्श महिला होत्या, आम्ही पन्नास एक पुरुष मंडळी असू. माईकची व्यवस्था झाल्यावर चळवळीतील गाणी व दारू विरोधात घोषणा सुरु झाल्या. आता जरा काहीतरी घडते आहे असा वाटू लागल. गणेश व सुनील ने "सांग सांग भोलानाथ दारू मिळेल का? " हे गाण म्हंटल. त्यानंतर गोरक्ष भाऊनी आपण इथे का जमालो आहोत याची सर्वाना कल्पना दिली. या धरण्यामधे सहभागी असलेल्या विविध संघटनांनी मागील काही दिवसात धान्यापासून दारू विरोधात स्वाक्षरी व पोस्टकार्ड मोहिम राबवल्या होत्या, त्यात निर्माणच्या वतीने आम्हीही वाशी व ठाणे इथे अशाप्रकारचे काम केले होते, तर या सर्व स्वाक्षऱ्या व धान्यापासून दारू विरोधी अभियानाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना द्यावयाचे असे धरण्याचे स्वरूप ठरले. जेव्हा एखादी संघटना आझाद मैदानावर काही मागण्या घेवून धरणे धरते किंवा मोर्चा काढते, तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हि जवाबदारी असते कि त्यांनी मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जनतेच्या मागण्या/मते त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर आपणास त्या संबधित मंत्र्यांची/अधिकाऱ्यांची भेट हवी असेल तर तशी व्यवस्था होऊ शकते. अर्थात या गोष्टी मला माहित नव्हत्या, या आधी कितीदातरी मी या मैदानासमोरून गेलो असेन पण या गोष्टीची कल्पना नव्हती. आता घोषणा व भाषणे यांमुळे धरण्याचा रंग चढू लागला होता, उल्काताई तर खूप छान बोलल्या, सुरेश काकांनी आपल्या मागण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे, व त्यांना २३००० सह्या असणारे मागण्यांचे निवेदन देणे, पोलिसांसमोर ठेवल्या. अर्थात त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही, एकीकडे घोषणा चालू होत्याच. संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतरही काहीच होत नाहीये असे दिसल्यावर आम्ही पोलिसांना इशारा दिला कि जर आम्हाला थोड्यावेळात भेट मिळाली नाही तर सर्व चारशे लोक मंत्रालयात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावरही पोलिसांनी चलढकलपणा केला, मग आम्ही मंत्रालयात सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले व दोन-दोन च्या रांगा करून, हातात पोस्टर्स घेवून आझाद मैदानाच्या गेट कडे जाण्यास सज्ज झालो. आम्ही उत्साही तरुण पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो, तेव्हा भारती ताईनी काही महिलांना पुढे उभे करून आम्हाला मागे पाठवले, त्याचे कारण नंतर लक्षात आले. समोर महात्मा गांधींचा फोटो घेवून दोन महिला होत्या, त्यांच्या मागे दोन-दोन च्या रांगा करून आम्ही सर्वजण आझाद मैदानाच्या गेट कडे निघालो. हा आमचा पवित्रा पाहून पोलीसांमधेही हालचाल दिसू लागली. आता पोलिसांची संख्या वाढलेली होती, जवळपास ५०-६० पोलीस आझाद मैदानाच्या गेट वर आम्हाला अडवण्यासाठी जमा झाले होते. मागे पाच-सहा पोलीस व्यानहि होत्या, बहुदा अटक करावी लागलीच तर कामी येतील असा विचार असावा. आम्ही गेट कडे चालू लागलो, सर्वांनाच पुढे काय होणार याची उत्सुकता होती अन थोडी भीतीही वाटत होती. पोलीस, मोर्चा, धरणे या अश्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच अनुभवत होतो, आपण काहीतरी वेगळ अनुभवतोय असा वाटत होत. आम्ही सगळे गेटला भिडलो व पोलिसांनी बंद केलेले गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो, तर ते आम्हाला मागे रेटत होते, सगळे आझाद मैदान घोषणांनी भरून गेले होते - "बडी शरम कि बात है पुलिसभी उनके साथ है" अन "एक रुपयाचा कडीपत्ता, मुख्यमंत्री बेपत्ता". काही वेळातच वातावरण चांगलेच तापले, पोलीस अन कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी सुरु झाली, पाच सहा पोलीस गोरक्ष भाऊना घेरून त्यांच्याशी बाचाबाची करू लागले, त्यांच्यावर उगारलेली काठी सुनीलने हातात पकडून ठेवली, मग पोलिसांनी सुनीलला बाहेर काढले अन गाडीत टाकले. आता मात्र सगळाच जमाव उसळला व घोषणांचा जोरही वाढला. मला त्या क्षणाला एक गोष्ट जाणवली कि आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर गांधींना 'इंग्रजांनो देश सोडा' असे म्हणतांना किती संघर्ष करावा लागला असेल. एका क्षणासाठी त्या कल्पनेने मी थरारून गेलो, बाहेर एवढा गोंधळ चालू असतानाही त्या क्षणासाठी अंतर्मुख झालो. नाहीतर आज पर्यंत सत्याग्रह, मोर्चा, आंदोलने हे शब्द नुसते वाचत किंवा ऐकत आलो होतो, त्याचा थोडा थोडा अर्थ आता कळतोय अस वाटू लागल. चांगल्या गोष्टींसाठी असा हा संघर्ष करणार्यांबद्दल आदर वाटू लागला अन मी नकळत ते गेट जोराने ढकलू लागलो. साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी, मुख्यमंत्री तर नाही पण गृहमंत्रालयातील सचिव श्री संगीतराव भेट घेण्यासाठी तयार आहेत असे सांगितले व तुमच्यापैकी कोणीही एकजण भेटू शकता असा निरोप पोलिसांनी आम्हाला सांगितला. पण आम्ही कमीतकमी पाच जणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटेल या मुद्यावर अडून राहिलो, थोड्याच वेळात तीही परवानगी मिळाली. मुख्यमंत्री मुंबईमध्ये नाहीत तेव्हा संगीतरावना भेटा ते तुमचे म्हणणे मुख्यमंत्र्यानसमोर मांडतील असे सांगण्यात आले. सचिन, सुरेश काका अन आणखी तीन असे पाचजण सचिवांना भेटण्यास पोलिसांच्या गाडीतून गेले. आम्ही सगळे परत मैदानात येऊन बसलो. तासाभराने शिष्टमंडळ पोलिसांच्याच गाडीतून परत आझाद मैदानावर आले, सचिवांनी निवेदन स्वीकारले होते, व ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते. सचिन म्हणाला कि सचिवांनी आम्हाला विशेष काही बोलू दिले नाही, तुम्हीच पुन्हा या विरोधाचा नीट विचार करा या विषयीचा तुमचा अभ्यास नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. एक गोष्ट तर स्पष्ट झाली कि एवढ्या सहजा सहजी आपले ध्येय साध्य होणार नाहीये, हि तर सुरवात आहे ...आगे आगे देखो होता है क्या?

Tuesday 10 November 2009

पर्यावरण पूजा

पर्यावरणाच्या प्रश्नानकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली ती दिलीप कुलकर्णी यांच्या पुस्तकांमुळे (हसरे पर्यावरण, निसर्गायण) त्या आधी हे प्रश्न खूप लांबचे वाटायचे, म्हणजे प्रदूषण कोण करत तर कारखाने, मोठाले उद्योग मग त्यांनीच यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, शासनाने त्यावर नियंत्रणे आणली पाहिजेत, कचरा प्लास्टिक ने वाढतो न मग प्लास्टिक वर शासनानेच बंदी घातली पाहिजे, किंवा प्लास्टिकला पर्याय दिला पाहिजे...हे प्रश्न मला माझ्या पातळीवर नाहीतच अस वाटायचं, पण दिलीप कुलकर्णींची पुस्तक वाचताना हे जाणवायला लागल कि जरी कारखाने प्रदूषण करत असले तरी त्यात तयार होणाऱ्या वस्तू कोण वापरत? आपणच, म्हणजे आपणच त्या प्रदूषणाला जवाबदार आहोत, किंवा साधी दुधाची पिशवी विकत आणली तरी त्यासाठी प्लास्टिक पिशवी कोण घेत तर मी, मग मी हि या प्रदूषणात सहभागी आहेच कि, रोज हजारो सागरी जीव प्राणाला मुकतात कारण आहे कारखान्यातील दुषित द्रव जी कि माझ्याच घरातली एखादी वस्तू तयार करायला वापरलेली असतात, म्हणजे पर्यावरणाचे प्रश्न माझ्या पासूनच सुरु होतात.

जस वाचत गेलो तस जाणवायला लागलं कि या प्रश्नान बाबत जेवढं आपण जागृत असायला हव तेवढी जागृती अजूनही नाही. बऱ्याच जणांशी चर्चा करताना हेच जाणवायचं कि एक तर त्यांना पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत फारच वरवरची माहिती आहे किंवा त्यांचे पर्यावरणा संबंधी विचार हे माझ्या आधीच्या विचारान सारखेच आहेत. या बाबत काय करता येईल अस विचार मनात सुरु झाला. या गोष्टी समजवण्यासाठी या विषयावर चर्चा होण आवशक आहे अस वाटू लागला. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणाचे प्रश्न वगेरे गोष्टीना फारस स्थान नसत, या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र येत नाही, या विषयी माहितीची देवाण घेवाण होत नाही. हा विचार घेवून मी काही लोकांना एकत्र कस अणु हा विचार करताना मला पर्यावरण पूजेची कल्पना सुचली. (मला नंतर कळले कि हि काही नवीन कल्पना नाही अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत).

तर पर्यावरण पूजा हि प्रतीकात्मक पूजा असेल जी आपण कैटुंबिक पातळीवर करू शकू पण जी कुठल्याही कर्म कांडात अडकणार नाही. याचा महत्वाचा उदेश पर्यावरण जागृती हा असेल. त्या प्रमाणे मी पर्यावरण पूजेचा आराखडा तयार केला.

या पूजेला दुसरी बाजू अशी कि, माझ्या मते आजच्या विज्ञान युगात आपण करत असणाऱ्या बऱ्याच धार्मिक विधिना/ पूजाना (उदा सत्यनारायण ) आज काहीही संदर्भ उरलेले नाही, तरीही आपण त्या करतो कारण आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही. आपल्या धमार्तील पूर्वापार चालत आलेल्या स्नेहमीलन स्वरूपाच्या पूजना केवळ धार्मिक नाही तर सामाजिक अथार्ची आज सुसंगत असलेल्या पयार्वरणाशी संबंधित असलेल्या पर्श्नांबरोबर सांगड घालण्याचा हा एक पर्यत्न आहे.

पर्यावरण पूजा : खालील उपक्रम असतील
1) प्रतीकात्मक वृक्ष पूजा
2) पर्यावरणाची संकल्पना, मानव आणि पर्यावरण यांच्यातील नातं, पर्यावरणाच्या समस्या, पर्यावरणाची जपणूक आणि प्रदूषण आदी विषयांवर चर्चा, कृति
3) पर्यावरण विषयक छोटस प्रदर्शन
4) सर्वांनी एकत्रितपणे पर्यावरण विषयक लघुपट पाहणे व त्यावर चर्चा करणे.

अशा प्रकारची पूजा आम्ही ०७/११/०९ रोजी साजरी केली त्याचा हा वृतांत:

सर्व निमंत्रित मंडळी ( जवळपास १५ व्यक्ती ) सायंकाळी ५.३० ला आमच्या घरी एकत्र जमलो, वट वृक्ष रोपण व पूजा झाली, सर्व पाहुण्यांना पर्यावरण पुजेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रक देण्यात आले. नंतर सर्वांनी पर्यावरण विषयक प्रदर्शन पाहिले, एकमेकांचा परिचय करून घेतल्या नंतर आम्ही सर्वांनी मिळून 'स्टोरी ऑफ स्टफ' नावाचा पर्यावरण विषयावरील Annie Leonard यांचा माहितीपट पहिला, या दरम्यान पर्यावरण या विषयावर चर्चा चालूच होती, प्रत्येक जन स्वताची पर्यावार्नाबाद्दल्ची मते मांडत होता.

फलाहारानंतर जोन्धालेकर काकांनी ते करत असलेल्या कामाबद्दल माहिती सांगितली - त्यांनी व त्यांच्या काही मित्र मंडळीने पर्यावरण संवर्धन व निसर्ग पर्यटन विषयावर बातच काम केलंय, जोंधळेकर काका व मित्र मंडळीना दुर्ग रोहन व ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्याचा तरुणपणा पासूनच छंद होता, पण किल्यांची वाईट अवस्था पाहून त्यांना आपण या साठी काही तरी करावे असे वाटू लागले. तेव्हा या सर्व मंडळीनी मिळून ' राज माची ' या गडाचा एक
चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा चंग बांधला तो हि कसलीही सरकारी मदत न घेता अन तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतहि आणला. नंतर काकांनी निसर्ग सावर्धानाचे महत्व थोडक्यात सांगितले.

धनंजय मदन हे पनवेलच्या ' निसर्ग मित्र ' या संस्थेशी सलग्न आहेत, धनंजय काका हे खरच एक निसर्ग मित्र आहेत हे त्यांच्या बोलणे व कृतीतून जाणवत होते, ते नियमित अंघोळीसाठी थंड पाणी वापरतात, सायकल व सार्वजनिक वाहनांचाच वापर करतात (स्वताचे वाहन घेण्याची ऐपत असूनही :)) वाढदिवस, प्रिय जणांची आठवण व उत्सव ते वृक्षावारोपण करूनच साजरे करतात, महत्वाचे म्हणजे लहान मुलांमध्ये निसर्ग बद्दल ओढ निर्माण व्हावी या साठी ते लहान मुलांच्या निसर्ग सहली आयोजित करतात. ते भारतभर सायकल वर हिंडून आलेत, गोवा च काय पण वाघा बोर्डर ते सायकल वर सर करून आलेत. पर्यावरण च्या संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात आपण सर्व काय करू शकतो याची यादीच त्यांनी आम्हाला वाचून दाखवली, पर्यावरण संवर्धनाची पहिली पायरी हि स्वताच्या काही सवई बदलण हीच असू शकते हे त्यांनी सांगितलं. अन त्यातील एक तरी उपाय अमलात आणण्याचा आम्ही निश्चय केला.

हा संपर्क असाच वाढवत ठेवून, या पुढे पर्यावरण संबंधी वैयक्तिक व सांघिक पातळीवर कृती कार्यक्रम करायचा असे ठरवूनच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

त्रिशूल

Wednesday 4 November 2009

THE HAPPIEST MAN

An essay from Danny Kaye

Jacob kominiski never achieved fame and never accumulated wealth.
He was a simple tailor, and pleased to be one. He walked the streets of our Brooklyn neighborhood with great dignity, but always with a glint of laughter in his eye .He was my father, and most successful human being I ever knew.
As a child I didn't fully understand his worth. When I saw how hard he worked for so little material award I felt sorry for him and a little ashamed at his lack of ambition. I was wrong on both counts.
He worked for a Seventh Avenue dress manufacturer and one summer evening he brought home an enormous sketch pad, a handful of soft pencils, and some wool and silk and cotton swatches. He announced that the boss was giving him a chance to become a dress designer, something he had long hoped for.
Night after night he worked until midnight or later. A slight man with thin fair hair and shoulders rounded by his trade, he stood by the kitchen table, bending over the sketch pad to make quick, swirling lines while mother at near by, mending. She was a beautiful woman with long aburn hair piled high above a serene face.
Supposedly asleep in the next room, my two brothers and I listened to the nightly routine : the sisbilance of pencil on paper for a long time, then pop calling mother, "Chaya, come look."
Her dress rustled as she moved to stand beside him. Sometimes she made a suggestion for a change; usually she said, "I think it's just fine." And sometimes pop would draw an outstanding ornament so they could both laugh. Laughter was the part of everything he did.
When at last the sketches were finished, he took them off to work. Nothing more was said about them. Eventually I asked him, "Pop, what happened to the drawings?"
"Oh," he said, "They weren't any good.", seeing my dismay he said, "Danny, a man can't do everything in this world but he can do one job well. I found out I am not a good designer , but I am a good tailor."
And there I found the key to the man, the key that let me understand better as I grew older. Jacob Kominiski never pretended to be something he wasn't. Free from vanity or unrealizable ambition he was able to enjoy each day as it came.
The core of pop's happiness was his family. Amost any event served as an excuse for a reunion with all our uncles and aunts and cousins. Such laughter and jokes and sheer loving exuberence _ and all sparked by my mother and father. They were always the first couple on the floor to dance, and the first to start singing the old folk songs. While the rest of us clapped hands to the rhythm. Part of Pop's pleasure was showing off his wife, a shy sort of reverence. He thought no one in the world could match her .He once said of her," Where she walks there is light. "
Every night at dinner he reported the amusing things that happened in during the day.( We never herd of any defeats or frustrations. ) The most ordinary events were hilarious when pop told us about them.

Part 2
Pop enjoyed all men, but he reserved his friendship for a few-especially five cronies who had emigrated with him from Russia at the time of First World War. Once a month they gather in our kitchen for an evening of talk. All these men had achieved business success. Yet in many matters it was to Jacob Kominiski they turned for advice, knowing that he saw life clearly and his opinions could not be warped by envy.
They came to our rather shabby neighborhood in big cars, wearing expensive suits, and smoking cigars. I once asked my mother, "Why do they come here in stead of meeting in their own big houses?"
She thought for a moment, and then said, "I think may be they left best part of themselves here. They need to come back to it every now and then."
When I was 13 my mother died .Through my own grief I was aware of the great loss these was to Pop. But he made only one reference to almost insupportable sadness. He said, "To be happy everyday is to be not happy at all." He was saying to his sons that happiness is not state achieve and keep, but something that must be won over and over, no matter what the defeats and losses.
In my early teens I ran away from home for the simple reason that I was bursting with curiosity about the world outside Brooklyn. I talked a pal of mine into going with me. Our thumbs got us lifts, we sang for food, and at night we appeared at the local police station to announce we were hitchhiking to relatives and asked to be put in a cell until morning. It worked well until we reached a small town in Delaware.
The chief of Police said, "You kids look like a couple of runaways. You say you are from Brooklyn? I shall just telephone and see if there 'wanted' on you."
He found that there was indeed a missing person alarm for me. He soon had my father on the phone. After hearing I was alright, Pop seemed to relax. "You want me to send him home?", the chief asked. "Oh, no", father said." He wants to find out something. He will come home when he is ready."
I was on the road for two weeks ,and when I finally walked down the familiar street towards our house I began to get apprehensive. I was afraid I had hurt Pop by running away. How could I find the right words to explain to him why I went?
As it turned out, it was Pop who found the right words. When I came through the front door he looked up from his news paper, and a wonderfully warm and relieved smile went over his face. Then he gave me a wink and said," There's food in the ice box, Danny." The words he had always greeted me with when I came home from school or play. So nothing had changed between us. He understood me, and my searching and longings, so unlike his own or my brothers.

part 3
His patience with me during my late teens was infinite. Both my brothers had jobs and were hardworking, responsible citizens, but I was moody and restless and could not settle down. I wanted to express myself, but I didn't know how. Pop supported me uncomplainingly; once a week I found a five-dollar note tucked beneath my pillow, to save me the embarrassment of openly receiving pocket money.
My shortcomings did not escape the notice of Pop's cronies. Every time they gathered in our kitchen they would ask, "Danny got a job yet?" Pop would shake his head and change the subject.
One evening I heard a voice say," Jacob, I speak to you as a friend must speak. Danny is becoming a loafer. You should not allow this to happen."
Pop said," My son is searching for something he can devote his life to. I can't tell him what it is. He shall never be happy unless he finds it for himself. It may take him longer than others, but he shall find it. I do not worry about him."
Later that year I got a job as an entertainer, and suddenly I knew this was the career I had been searching for. The world of the theatre was far removed from the world of Jacob Komoniski, the tailor, yet I found myself returning to him time and again, for the same reason his cronies did.
When I was 20, I got what every actor dreams of a permanent job! The A.B.Marcus show, 'La Vie Paree', was an extravaganza that had been touring the world for a quarter of century, and I joined the cast. We played the orient for a couple of years and then returned to the states for a series of one night stands when we reached the New York area; I went home to see Pop.
I had a problem, and I put him. This was at the depth of Depression { of 1929 which resulted from the collapse of U S stock market } , actors were out of work by the hundreds, yet I wanted to leave the show because I need new experiences and challenges. But also I was scared.
Pop heard me out,then said, " It's very to have a steady job. You shouldn't be ashamed of liking it. But there are some people who always have to test themselves, to stretch their wings and try new winds. If you think you can find more happiness and usefulness this way, then you should do it."
This advice came from a man who had never left a secured job in his life , who had the Europian tradition of family conformity and responsibility, but who knew I was different. He understood what I needed to do and he helped me to do it.
For the next few years I worked in nightclubs, and then I got my big theatrical break, appearing in 'Lady in the Dark' with Gertrude Lawrence.
After that I went to Hollywood, but even the glamour of movie capital did not awe Pop.
For some of the time between his retirement and his death at the age of 80 Pop lived with me and my family there. We had a big party one evening, and soon there was a crowd round him listening to his stories about Brooklyn and his Ukranian Legends.
That I thought Pop might enjoy hearing some of the old folk songs we used to sing, the music and the memories were too much for himto resist, and he came over to join me. I faded away, and he was in the middle of the room singing alone _ in a clear, true voice. He sang for 15 minutes before some of the World's highest-paid entertainers. When he finished there was a thunderous applause .
This simple ,kindly old man singing of our Europian roots had touched something deep in these sophisticated people. I remember what my mother had said about; Pop's rich cronies: "I think may be they left best part of themselves here. They need to come back to it every now and then."
I knew the applause that night was not just for a performance; it was for a MAN.
- Danny Kaye.